आलिया पुन्हा झाली ट्रोल

मुंबई – “स्टुडंट ऑफ द इयर’, “हायवे’, “2 स्टेटस’, “हम्प्टी शर्मा की दुल्हनियां’, “कपूर ऍन्ड सन्स’, , “बद्रीनाथ की दुल्हनिया’, “राजी’ आणि “गली बॉय’ सारख्या सिनेमांमधून आपल्या अभिनय क्षमतेची चुणूक दाखवणाऱ्या आलिया भटच्या बॉलिवूडमधील पदार्पणाला आता यंदा 6 वर्षे पूर्ण झाली आहेत.

 

View this post on Instagram

 

?‍♀️

A post shared by Alia ? (@aliaabhatt) on

मात्र गेल्या काही वर्षात तिला सोशल मिडीयावर चांगलेच ट्रोल केले गेले. कधी पत्रकारांच्या प्रश्नांवरील उत्तरांवरून आलियाला ट्रोल करण्यात आले तर कधी रणवीर सोबतच व्यक्तिगत चर्चांवरून सोशल मीडियाचा युजर्सने चांगलेच आलियाचे फोटो ट्रोल केले जातात.

दरम्यान, एका इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा आलियाची जीभ घसरली आणि योगायोग असा की यावेळीही ती करण जोहरच्याच प्रश्नाचं उत्तर देत होती. यावेळी उत्तर देताना आलियाच्या तोंडून अश्लील शब्द निघाल्यानं उपस्थित प्रेक्षकांमधून एकच गोंधळ ऐकू आला.

 

View this post on Instagram

 

?

A post shared by Alia ? (@aliaabhatt) on


रविवारी आलिया भटनं करिना कपूरसोबत जियो मामी मूव्ही मेला विथ स्टार्स 2019 मध्ये हजेरी लावली. यावेळी निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याच्यासोबत या दोघींनीही गप्पा मारल्या. प्रश्नोत्तरांच्या या सेशनमध्ये करणच्या प्रश्नांची उत्तरं देताना आलियानं करिनाची खूप स्तुती केली.

Leave A Reply

Your email address will not be published.