मथुरा – उत्तर प्रदेशातील एका पोलीस हवालदाराने आपल्याच एका सहकारी पोलीस हवालदाराला मारून पंख्याला फाशी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोषी पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले. दोषी हवालदाराने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत शिवसेना खासदारांनी आपली ‘इच्छा’ स्पष्टच सांगितली…
रोहित असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून तो नौजहिल पोलीस ठाण्यातील शिपाई आहे. तर आशिष असे मयत हवालदाराचे नाव आहे. गुरुवारी या दोघांनी मद्यप्राशन केले होते.
मद्यधुंद अवस्थेत दोघांमध्ये बाचाबाची झाली. आशिष याने रोहितच्याविरोधात ऍट्रॉसिटीच्या कायद्याखाली तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. त्यावर रोहितने आपल्या काठीने आशिषला मारहाण करायला सुरुवात केली आणि शेवटी त्याला पंख्याला लटकावले.
महाराष्ट्र हादरला! अमरावतीत नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या केमिस्टची निर्घृण हत्या
आशिषच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे रोहित याला पोलिसांनी अटक केली आहे.