Murder | kolhapur news | living relationship – साखरपुडा झाल्यानंतरही मित्रासोबतच लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट धरणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा आई, भाऊ व मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली आहे. ।Murder | kolhapur news | living relationship
या प्रकरणी पोलिसांनी या तिघांविरोधातही खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे कोल्हापूर व पंचक्रोशीत एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (24) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एका बँकेत नोकरीला होती.
तिच्या लाघवी स्वभावामुळे तिचा मोठा मित्र परिवार होता. वैष्णवी कोल्हापूरमधीलच एका ढोल ताशा पथकाची सदस्याही होती. पण तिने मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट् धरला होता. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण करत तिची हत्या केली.
वैष्णवीच्या लिव्ह इनमध्ये राहण्याच्या निर्णयाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यांनी तिला अनेकदा समजावून सांगितले. पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे आई शुभांगी पवार, भाऊ श्रीधर पवार व मामा संतोष आडसूळ या तिघांनी तिला पन्हाळा तालुक्यातील देवठाणेत नेले.
तिथे तिला रात्रभर काठी, लोखंडी गज व दोरीने मारहाण केली. या अमानुष मारहाणीत वैष्णवीला जिवघेण्या जखमा झाली. ती रात्रभर घरीच जखमी अवस्थेत पडली होती. तिला गुरुवारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीची आई, भाऊ व मामा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.