पुणे (प्रभात वृत्तसेवा) – लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकातील चेंबरचे निकृष्ट काम निखील कन्स्ट्रक्शनचे नसल्याचा दावा निखील कंन्स्ट्रकशनचे बाळासाहेब पासलकर यांनी केला आहे. या ठिकाणी केवळ ड्रेणेज लाईन टाकणाचे काम आमच्या कंपनीने केले होते. तर त्यानंतर महापालिकेच्या ड्रेणेज विभागाने हा खोदाई केलेला रस्ता पूर्ववत केला असल्याचे पासलकर म्हणाले.
मागील आठडयात शगुन चौकात एका चेंबरच्या निकृष्ट कामांचा निषेध करण्यासाठी या चेंबरच्या झाकणावर शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या डायलॉगचा फलक लावण्यात या ठिकाणी ठेकेदार तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक लावण्यात आलेले होते.
हे फोटे सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले होते. मात्र, आमच्या कंपनीने केवळ ड्रेणेज लाईन टाकलेली असून त्यानंतर खोदाई दुरूस्त केलेली आहे. त्या खोदाईचे कॉंक्रीटीकरण तसेच चेंबर समतल करण्याचे काम महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने केले आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाशी आमचा काहीच संबध नसल्याचे पासलकर यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.