Nilesh Lanke on Sharad Pawar| राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामिल झालेले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा घरवापसी करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीआधीच अजित पवार गटाला धक्का बसला आहे. निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान पुण्यात शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचवेळी लंके प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे. निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण अजित पवार गटाला तीन ते चारच जागा मिळण्याच्या चर्चेमुळे त्यांची अडचण झाली होती. पण पुन्हा एकदा शरद पवारांची साथ दिल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार होण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे. Nilesh Lanke on Sharad Pawar|
दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील निवडून आले होते. मात्र निलेश लंके यांना अजित पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी हवी होती. त्यामुळेच लंके यांनी शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
अमोल कोल्हेंची निलेश लंके यांना थेट ऑफर
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पारनेरचे आमदार निलेश लंके अजित पवार गटासोबत राहिले. मात्र, गेल्या काही दिवसांपासूनची त्यांची भूमिका पाहात ते कोणत्याही क्षणी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना जाहीरपणे आपल्यासोबत येण्याची साद घातली होती. लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना थेट ऑफरच दिली होती. त्यानंतर आज थेट शरद पवार गटात लंके प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. Nilesh Lanke on Sharad Pawar|
हेही वाचा:
अजित पवार गटाला धक्का; निलेश लंकेंची घरवापसी, शरद पवार गटात करणार प्रवेश