Shahrukh Khan and Kamal Hassan| सध्या टॉलीवूड इंस्ट्रीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बॉलीवूडचे अनेक कलाकार देखील दाक्षिणात्य चित्रपटात अभिनय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून टॉलीवूडच्या चित्रपटांनी घेतलेली झेप, बॉक्स ऑफिसवरील त्यांची कमाई आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. यातच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे कमल हासन यांनी बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे वृत्त समोर येत आहे.
कमल हासन यांना बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध चित्रपटामध्ये व्हिलनचा रोल ऑफर केला होता. मात्र त्यांनी नम्रपणे त्याला नकार दिला होता. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘मैं हु ना’ या चित्रपटात काम करण्याची ऑफर त्यांना देण्यात आली होती. प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यात व्हिलनच्या भुमिकेत कमल हासन यांनी काम करावे अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. मात्र काही केल्या हे शक्य झालं नाही. शेवटी ती भूमिका सुनील शेट्टीला मिळाली. Shahrukh Khan and Kamal Hassan|
फराह एका मुलाखतीत म्हणाली की, “मी सुनील शेट्टीनं जी भूमिका साकारली त्यासाठी अनेक दिग्गज अभिनेत्यांना विचारले होते. सुरुवातीला नसीरुद्दीन शाह यांनी नकार दिला. मग आम्ही कमल हसन यांच्याकडे पोहचलो. मला आठवतंय, त्यावेळी शाहरुखने मला सांगितलं होतं की, कमल सर हा चित्रपट नक्कीच करतील. मी त्यांच्यासोबत ‘हे राम’ केले आहे. सर माझ्यावर खूप प्रेम करतात. ते या भूमिकेला नक्कीच सहमत असेल. पण कमल सर सुद्दा नाही म्हणाले.”
पुढे ती म्हणाली, “मग मी नाना पाटेकरांकडे गेले. त्यांनीही या भूमिकेसाठी मला आठवडाभरानंतर नकार दिला. नाना पाटेकरांनी भूमिका नाकारली पण त्यांनी मला काही चांगले मुद्दे सांगितले. आम्हाला खलनायक म्हणून मोठा अभिनेता हवा होता. त्यानंतर आम्ही सुनीलसोबत संपर्क साधला आणि त्यांनी लगेचच चित्रपटाला होकार दिला.” Shahrukh Khan and Kamal Hassan|
दरम्यान, 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, सुश्मिता सेन, अमृता राव, झायद खान, किरण खेर, नसिरुद्दीन शहा, मुरली शर्मा, सतीश शहा, बोमन इराणी आणि कबीर बेदी, राखी सावंत यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
हेही वाचा :
“अरुण गोयल यांच्या राजीनाम्याचे नेमकं गूढ काय?” ठाकरे गटाचा मोदी सरकारला सवाल