निंबळकमध्ये युवकाचा शॉक लागून मृत्यू 

विडणी  – निंबळक (ता. फलटण) येथील युवकाचा मंगळवारी सकाळी विहिरीवरील मोटर चालू करत असताना शॉक लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला. नवनाथ अशोक यादव (वय 25) असे संबंधित युवकाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, निंबळक येथील नवनाथ यादव हा युवक मंगळवारी सकाळी शेतातील विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी गेला होता. यावेळी मोटर चालू करत असताना त्याला शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
काही वेळानंतर ही बाब नवनाथच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आली.

त्यानंतर तात्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. नवनाथ हा फलटण तालुका संभाजी ब्रिगेडचा उपाध्यक्ष होता. त्याच्या आकस्मिक निधनामुळे निंबळक गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्‍चात एक लहान भाऊ, एक विवाहित बहीण, आई, वडील असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.