राज्यमंत्री शिवतारे यांची रायगड मोहीम

वाघापूर – पुरंदर-हवेलीमधील युवकांसाठी विजय शिवतारे मित्रमंडळाच्यावतीने रविवारी (दि. 7) रायगड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत राज्यमंत्री शिवतारे स्वत: सहभागी होणार असून किल्ले रायगडवर पायी चढाई करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन या मोहिमेत घेण्याचे नियोजित असून युवकांनी या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे सचिव आणि जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी केले आहे.

या मोहिमेत सहभागासाठी नाव नोंदणीकरिता गावातील शिवसेना शाखाप्रमुख व पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यादव यांनी केले आहे. रायगड मोहिमेत किल्ले रायगड सर केल्यानंतर महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले जाईल. नंतर किल्ल्‌यावरील जगदीश्‍वर मंदिरात दर्शन घेतल्यावर इतिहासकार विश्‍वास पाटील आणि नितीन बानुगुडे पाटील यांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर गड उतरण्यास सुरवात होईल. युवकांना चहा, नाष्टा, जेवण अशा सर्व सोयीसुविधा दिल्या जाणार असून प्रवासासाठी लक्‍झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप तसेच शिवसंग्राम महायुत्तीचे सर्व पदाधिकारीही या मोहिमेत सहभागी होणार आहेत. साधारणतः 18 ते 30 या वयोगटातील युवकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यादव यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)