मांडवगण फराटा – शिवरायांचे कार्य, विचार अखंड प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन शिरूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा प्राचार्य तुकाराम बेनके यांनी केले. शिवजयंतीनिमित्त श्री भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा येथे ढोल, ताशा, लेझीम या पौराणिक वाद्यांच्या गगनभेदी निनादात प्रती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक काढून जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्यात्या वैष्णवी संतोष आरवडे यांचे व्याख्यान झाले.
सावता महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वैभव शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. शिरूर तालुका सावता परिषदेचे अध्यक्ष शरद रासकर, माजी सरपंच सतीश आरवडे, योगीराज मोरे, रणजित कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. रवींद्र चौधरी, पांडुरंग वेताळ, विलास वाघचौरे, विशाल अवचिते, संतोष वेताळ, बाळासाहेब खेडकर, प्रा. संतोष शेळके, भरत रासकर, प्रा. गोरक्षनाथ डुबे, उपप्राचार्य संभाजी कुटे यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच सृष्टी शितोळे, भूषण आबनावे, आदित्य वाघचौरे, सुकन्या मोरे या मुलांनी शिव विचार मांडले. या कार्यक्रमास दिलीप वाळके, अंबादास गावडे, देविदास कंठाळे, शरद शेलार, ज्योती गजरे, बाबू मगर, मच्छिंद्र बेनके ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी केले. नितीन गरूड यांनी आभार मानले.