निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला दुष्काळग्रस्तांची आठवण; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

मुंबई: निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला दुष्काळग्रस्तांची आठवण झाली हेही नसे थोडके. पक्षप्रमुख आणि त्यांचे पक्षीप्रेमी चिरंजीव ९ जूनपासून दुष्काळी दौऱ्यावर निघाले आहेत. अवघा महाराष्ट्र दुष्काळात होरपळून निघत असताना शिवसेनेच्या उत्तुंग नेत्यांनी परदेशगमनासाठी दुष्काळग्रस्तांकडे पाठ फिरवली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून येऊन थडकतो आहे. मग अशा पावसाळी दुष्काळी दौऱ्याचे प्रयोजन काय हे कोण समजावणार?, असा मिश्किल प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.

दुष्काळदौरा संपल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला उद्धव ठाकरे 16 जून रोजी भेट देणार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही राहणार आहेत. सहा महिन्यांपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिराच्या बांधकामाचा मुद्दा उचलत उद्धव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.