यवत : वरवंड ता.दौंड येथे दि.५ रोजी रात्री १२.०० वाजेच्या सुमारास परांडा विधानसभेचे आमदार तानाजी सावंत यांच्या टोयटा कंपनीची लॅन्डक्रुझर गाडीस क्रं.(एम एच १२ आर एफ ६०००) हिच्या मधुन उस्मानाबाद येथुन सोलापुर-पुणे महामार्गवरून पुणेकडे जाणेसाठी निघाले असताना त्यांच्या गाडीस वरवंड ता. दौंड याठिकाणी अपघातात झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत चालक सोनबा शंकर देवकाते यांनी रात्री ११:३० वाजनेच्या सुमारास मौजे वरवंड ता.दौंड गावचे हददीत कवठीचा मळा याठिकाणी आले. तेंव्हा सोलापुर-पुणे महामार्गाच्या डावे बाजुचे लेनने एक कंन्टेनर क्रं.(एनएल.०१.एडी.३३९५) वरील कंन्टेनरमध्ये पाठीमागील बाजूस कंटेनरच्या बाहेर अंदाजे ३ फुट एक मोठी मशिनरी ठेवुन घेवुन तसेच सदर वाहनास रिफलेक्टर नसताना चालवत. पुणे बाजुकडे घेवुन जात असताना त्याने त्याचे पाठीमागुन येणाऱ्या वाहनांची पाहणी न करता व पाठीमागुन येणाऱ्या वाहनांना कोणताही इशारा न देता त्याने त्याची लेन सोडुन कंन्टेनर हा अचानक रोडच्या उजव्या बाजुच्या लेनवर घेतले. कंन्टेनरची क्लिनर बाजुची फिर्यादी चालवत असलेले टोयटा कंपनीची लॅन्डक्रुझर गाडीचे उजव्या बाजुला जोरात धडक बसुन अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात कोणासही मार लागला नाही. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. कंन्टेनर चालक रोहीत देविदास वाघमोडे (रा.रेवन,सिध्देश्वर नगर, होटगी रोड, सोलापुर)असे असुन सदरचा अपघात हा त्याचे चुकीमुळे झाला असुन सावंत यांचे चालक फिर्यादी सोनबा शंकर देवकाते यांची त्याचे विरूध्द यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून,सदर अपघाताबाबत यवत पोलीस ठाण्यात गु.रजि.नं ४७८/२०२२ भा.द.वि कलम २७९,४२७ आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदशनाखाली पो. ना. इंगवले करत आहेत.