शिरूर -शिरूर तालुक्यात करोना बाधितांची संख्या 51 पार गेली आहे. गेल्या पाच दिवसांत तेरा रुग्ण सापडल्याने तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे.
रांजणगाव गणपती, शिक्रापूर, शिरूर शहरजवळ बाफना मळा, बाबुराव नगर, बाभुळसर, पाषाणमळा, कुरूळी या भागामध्ये हे करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे.
त्यामुळे शिरूर तालुक्यातील पूर्व भाग भाग पश्चिम भाग हा करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता वर्तवण्यातयेत आहे.
सोमवारपर्यंत शिरूर तालुक्यात 41 जण क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यात मेंगळवारी आणखीणच भर पडली असून हा आकडा साठच्या पार गेला आहे.