शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ येथील शिरूरचे पुत्र व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईचे डीसीपी रमेश मल्हारी धुमाळ यांना केंद्रीय गृह विभागाकडून आंतरिक सुरक्षा सेवा पदक 2020 देऊन गौरवण्यात आले आहे. गडचिरोली येथे जानेवारी 2014 ते सप्टेंबर 2016 तीन वर्ष काळात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते.
ऐरोली येथे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या फायरिंंग मध्ये दोन वेळा त्यांनी नक्षलवाद्यांना समोरासमोर लढा दिला आहे. गडचिरोली जंगलात अनेक वेळा शोध घेण्यासाठी त्यांनी नक्षलवादी एरिया पालथा घातला होता. कारकीर्दीमध्ये जंगलातील नक्षलवादी जसे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक तसेच शहरी भागात राहून नक्षलवाद्यांना मदत करणारे अशाच एका नक्षलवाद्याचा जन्मठेप शिक्षक पर्यंत पर्यंतच्या शिक्षेपर्यंत पोचवण्याचे कामही त्यांनी केले आहे.
साल 2016 मध्ये पोलीस महासंचालकांचे पदक (DG INSIGNIA), 2018 मध्ये महाराष्ट्र गृह विभागाच्यावतीने खडतर सेवा पदक आणि आता 2020 मध्ये केंद्रीय गृहविभागाने आंतरिक सुरक्षा सेवा पदक देऊन शिरूरच्या पिंपळे धुमाळ येथील पुत्राला गौरवल्या बद्दल शिरूर तालुक्याच्या शिरांमध्ये मानाचा तुरा रोवला आहे.
शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्यावतीने डीसीपी रमेश धुमाळ यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.