Balaji Kalyankar – ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरेच्या अंमलबजावणीवर मराठा समाज ठाम आहे. दुसरीकडे शासनाकडून कुठलाच निर्णय होत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. रविवारी तरुणांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली. ( Balaji Kalyankar )
आमदार कल्याणकर हे एका लग्न सोहळ्याला गेले असता, तिथे तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत वाहनाची तोडफोड केली. अर्धापूर तालुक्यातील देगांव कुराडा गावात ही घटना घडली.
बालाजी कल्याणकर आपली कार कार्यक्रम स्थळाजवळ पार्क केली होती आणि ते कार्यक्रमात गेले होते. मात्र काही वेळातच त्यांच्या वाहनावर दगड फेकून त्यांच्या कारची मागची काच फोडण्यात आली. हे कृत्य काही युवकांनी केल्याचे बोलले जात आहे.
मात्र या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र नेमके हे कृत्य कुणी केले हे अद्याप समोर आलेले नाही.