शिक्रापूर – येथे कालव्याच्या कडेला थांबून फोनवर बोलणाऱ्या युवकास कालव्याजवळ का थांबला म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून बेदम मारहाण केली. याबाबत विशाल हनुमंत रासकर (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अनिकेत भुजबळ, गोरक्ष भुजबळ, सुधीर भुजबळ, निखील भुजबळ, शुभम भुजबळ, भरत भुजबळ, गणेश भुजबळ, श्रीकांत भुजबळ, विनोद भुजबळ, वैभव भुजबळ (सर्व रा. तांबुळ ओढा, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मलठण फाटा येथील विशाल रासकर हे त्यांच्या मित्रासमवेत कालव्याजवळ फोनवर बोलत होते. त्यानंतर काही वेळाने पुन्हा नऊजणांनी येऊन विशाल याला मारहाण केली.