उद्या निवडणूक ; इच्छुकांची धाकधूक वाढली
केंदूर (प्रतिनिधी) – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक उद्या सोमवारी (दि. २९) होणार आहे त्यामुळे अवघ्या काही तासांवर निवडणूक प्रक्रिया उरली आसल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या सभापती पदाच्या निवडीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सभापती शशिकांत दसगुडे यांनी इतर सदस्यांना सभापती पदाची संधी मिळावी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दि. १५ जून रोजी दिला होता त्यानंतर इच्छुक संचालकांनी सभापती पदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती त्याच पार्श्वभूमीवर आबाराजे मांढरे, शंकर जांभळकर, मानसिंग पाचुंदकर आणि ऍड वसंतराव कोरेकर यांची नावे प्रमुख इच्छुकांच्या यादीत होती मात्र उद्या होणाऱ्या सभापती पदाच्या निवडणुकीत पक्ष कोणाला संधी देणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.
दरम्यान, शिरूर कृषी उप्तन्न बाजार समितीची तीन वर्षांपूर्वी निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने 15 जागा जिंकत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. भारतीय जनता पक्षाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर तोट्यात असलेल्या बाजार समितीला नफ्यात आणण्यासाठी या संचालक मंडळाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यामुळे सभापती पदावरून वाद होऊ नये अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिक करत आहेत त्यामुळे उद्या सभापती पदाची कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.