Sheikh Hasina : बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान आणि अवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना यांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर शेख हसीना सलग पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. त्यांना ३०० पैकी २०० जागांवर विजय मिळला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार नुसार, 76 वर्षीय शेख हसीना यांना 249,965 मते मिळाली, तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि बांगलादेश सुप्रीम पार्टीचे एम निजाम उद्दीन लष्कर यांना फक्त 469 मते मिळाली. गोपालगंजचे उपायुक्त आणि निवडणूक अधिकारी काझी महबूबूल आलम यांनी निकाल जाहीर केला.
2009 पासून बांगलादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच आहे. त्यापूर्वी 1991 ते 1996 या काळात शेख हसीना पंतप्रधान होत्या. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगने 300 संसदीय जागांपैकी 224 जागा जिंकल्या आहेत. बांगलादेश राष्ट्रीय पक्षाने चार जागा जिंकल्या आहेत. अपक्षांनी 62 जागा जिंकल्या आहेत, तर इतरांनी एक जागा जिंकली आहे. दरम्यान, उर्वरित दोन जागांसाठी अजूनही मतमोजणी सुरू आहे.
शेख हसीना त्यांचा लोकसभा मतदारसंघ गोपालगंज-3 मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना 2,49,965 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी एम. निजामउद्दीन लष्कर यांना अवघी 469 मतं मिळाली. शेख हसीना 1986 पासून आठव्यांदा गोपालगंज-3 मधून निवडणूक जिंकल्या आहेत. दरम्यान, शेख हसीना बांग्लादेशमध्ये सर्वाधिक काळापासून पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा रेकॉर्ड केला आहे.