संगमनेर – तालुक्यातील पिंपरणे येथील राजश्री शांताराम देशमुख ही गावातून पहिली यूपीएससी परीक्षा पास होणारी मुलगी ठरली. शांताराम देशमुख हे भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर शेती करून मुलांना कष्टाने शिकवले. राजश्रीने दहावीपर्यंतचे शिक्षण संगम सेवाभावी ट्रस्ट संचलित डॉ. भानुदास गेणुजी डेरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घेतले. तिला यूपीएससी उत्तीर्ण करण्याची जिद्द होती. तिने तीन वर्षे अभ्यास केला आणि यशस्वी होत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
“मुलींना त्यांच्या मर्जीप्रमाणे शिक्षण घेऊ द्या. त्या विश्वास कधीही तोडत नाही. राजश्रीने आमचा विश्वास सार्थ ठरवला, याचा अभिमान वाटतो,” असे शांताराम देशमुख म्हणाले. संगम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भानुदास डेरे व उपाध्यक्ष ऍड. श्रीराज भानुदास डेरे यांनी राजश्रीला फोन करून शुभेच्छा दिल्या.