नवी दिल्ली – नागरी विमान वाहतूक नियंत्रकांनी बोईंग 737 मॅक्स विमानावरील बंदी उठविल्यामुळे स्पाइसजेट कंपनीच्या शेअरच्या भावात शुक्रवारी तब्बल चार टक्क्यांची वाढ झाली.
जागतिक पातळीवर दोन मोठे अपघात झाल्यामुळे अडीच वर्षापूर्वी बोईंग 737 मॅक्स विमानावर भारतीय विमान वाहतूक नियंत्रकांनी बंदी घातली होती. भारतामध्ये फक्त स्पाईसजेट कंपनीकडे ही विमाने होती आणि ती वापराविना पडून होती. आता सप्टेंबरपासून ही विमाने उपयोगात आणण्याचे स्पाइसजेट कंपनीने जाहीर केले आहे.