नवी दिल्ली – बऱ्याच तांत्रिक चुका झाल्यामुळे अडचणीत असलेली स्पाइस जेट कंपनी आगामी काळामध्ये आपल्या ताफ्यातील विमानाची संख्या वाढविणार आहे. यासाठी या कंपन्याने गोष्वाक एव्हीएशन या कंपनीबरोबर विमाने लीजने घेण्याच्या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
या घटनांक्रमानंतर स्पाइस जेट कंपनीच्या शेअरचा भाव आज दोन टक्क्यांनी वाढवून 47 रुपयांवर गेला होता.
भारत सरकारने आता विमानाच्या तिकिटाची वरील मर्यादा रद्द केल्या आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून भारतातील विमान कंपन्यांच्या शेअरच्या भावात वेगात वाढ होत आहे.