मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे भारतीय बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली. दिली सराफात सोन्याचा दर 99 रुपयांनी वाढून 46,312 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी तयार चांदीचा दर 32 रुपयांनी कमी होऊन 61,667 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,798 डॉलर तर चांदीचा दर 23.67 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. फेडरल रिझर्व्हकडून पत धोरणाबाबत वक्तव्याच्या अपेक्षेमुळे विविध बाजार अस्थिर असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.