Share Market Opening : ख्रिसमसच्या सुट्टीनंतर, मंगळवारी वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग आठवड्यात भारतीय शेअर बाजार संमिश्र ट्रेंडसह उघडले. बीएसईचा सेन्सेक्स आणि एनएसईच्या निफ्टीनेही सकारात्मक सुरुवात केली आहे. निफ्टीने 15.50 अंकांनी उसळी घेतली आणि 21,364.90 अंकांवर पोहोचला.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 17.32 अंकांनी वाढून 71,124.28 वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात, आयटी क्षेत्रातील शेअर वगळता सर्व क्षेत्रातील शेअर वेगाने व्यवहार करत आहेत. मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही वाढ झाली आहे.
इन्फोसिससह आयटी कंपन्यांचे समभाग घसरले
1.5 अब्ज डॉलर्सचा मोठा करार कोसळल्याने इन्फोसिसच्या शेअर्सवरही परिणाम झाला आहे. सुरुवातीच्या व्यापारात त्याचे शेअर्स 2 टक्क्यांनी खाली गेले आहेत. UPL, Tata Steel, Tata Consumer Products, NTPC आणि ब्रिटानिया सारख्या समभागांमध्ये निफ्टी वर सुरुवातीला वाढ झाली आहे. दुसरीकडे, घसरणाऱ्या समभागांमध्ये इन्फोसिससह विप्रो, टेक महिंद्रा, टीसीएस आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचा समावेश आहे.
पेटीएमचे शेअर्सही घसरले
फिनटेक कंपनीतून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या वृत्तामुळे मंगळवारी कंपनीचे शेअर्सही घसरले.
बॉक्सिंग डेला अनेक जागतिक बाजारपेठा बंद असतात
26 डिसेंबर रोजी बॉक्सिंग डे असल्याने ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, इंडोनेशिया आणि न्यूझीलंडच्या बाजारपेठांमध्ये सुट्टी आहे.