Devendra Fadnavis on Sharad pawar : लोणावळ्यामध्ये शरद पवार गटांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला स्वत: शरद पवार उपस्थित होते. त्यांनी जाहीर सभेत आमदार सुनील शेळके यांना इशारा दिला. मला शरद पवार म्हणतात,लक्षात असू द्या.. असा इशारा यावेळी पवारांनी शेळकेंना दिला. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“पवार साहेब मोठे नेते आहेत. इतकी वर्षे ते राजकारणात आहेत. ५५ वर्षे ते राजकारण करत आहेत. या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी देणं योग्य नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे. ते माध्यमांशी बोलत होते. | Devendra Fadnavis on Sharad pawar
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,”शरद पवारांनी त्यांच्या विधानाचा पुनर्विचार करावा. ते कुठल्या स्तराला आहेत, याचा विचार करावा. कुणी आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल असं मला वाटत नाही। Devendra Fadnavis on Sharad pawar
नेमकं प्रकरण काय ?
सभेत बोलताना शरद पवार म्हणाले,”मला असं समजलं की, पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताहेत म्हणून धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला ? तुझ्या सभेला कोण आलं होतं ? असं म्हणत शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची आठवण शेळकेंना करून दिली. तसेच पवार पुढे म्हणाले,” यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही असा थेट इशाराचा पवारांनी यावेळी दिला. | Devendra Fadnavis on Sharad pawar
“30 लाख सरकारी नोकऱ्या, ट्रेनीला एक लाख रुपये..” राहुल गांधींनी गॅरंटी देत जाहीर केल्या 5 घोषणा
“मी मोदींना म्हणालो,हिम्मत असेल तर..” शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं