Sharad Pawar On PM Modi : भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा अशी टीका खासदार शरद पवार यांनी केली आहे. यावेळी पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा देखील साधला.भाजपकडून तपास यंत्रणांचा होणार वापर आणि त्याबाबतच्या राजकारणावर देखील शरद पवारांनी यावेळी उघडपणे भाष्य केले. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांना देखील प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष असं मोदी म्हणाले होते. राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला. असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो, हिंमत असेल, तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, मोदींनी चौकशी करावी. मात्र घडलं काय ? ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत असा घणाघात शरद पवार यांनी केला. | Sharad Pawar On PM Modi
भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडतं. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ही लवकरच अटक केली जाईल असंही पवार यावेळी म्हणाले. | Sharad Pawar On PM Modi
यावेळी पवार यांनी अशोक चव्हाणांचे देखील उदाहरण दिले ते म्हणाले,”आदर्श सोसायटी घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हात आहे, असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले”
मोदी की गॅरंटीवरून टीका
आज पंतप्रधान मोदींच्या रोज पान भरून जाहिराती येताहेत त्या कोणाच्या पैशाने दिल्या जाताहेत.जनतेच्या पैशांनी ही गॅरंटी दिली जातेय अशी टीका देखील पवारांनी यावेळी केली. | Sharad Pawar On PM Modi