Shalini Thackeray on Sushma Andhare : राज्यात मनसेने मराठीसह इतर मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरेंना काही दिवसांपूर्वी खोचक टीका केली होती. त्यालाच उत्तर देताना आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे( Shalini Thackeray )यांनी सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare)सडकून टीका केली आहे.
“शिल्लक सेनाप्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आपण नैराश्यात आहात”, असा टोला लगावत शालिनी ठाकरेंनी सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) निशाणा लगावला. शालिनी ठाकरेंनी, “अंधारेबाई, यापुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात, तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी. जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही”, अशी पोस्ट शालिनी ठाकरेंनी ट्विटरवर केली आहे. यासोबत शालिनी ठाकरेंनी( Shalini Thackeray ) मनसेचं एक जाहीर पत्रच शेअर केलं आहे.
शालिनी ठाकरेंनी ( Shalini Thackeray )आपल्या पत्रात सुषमा अंधारेंच्या(Sushma Andhare) टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. “काही हिंदू सणांमध्ये डी. जे. व लेझर लाईटमुळे होणारा त्रास याबाबत रोखठोक भूमिका घेऊन राज ठाकरेंनी त्याला विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेनं, सर्वपक्षीय संवेदनशील व्यक्तींनी त्याचं स्वागत केलं. पण हेच तुम्हाला बहुधा रुचलं नसावं. राज ठाकरेंवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहात. कुटुंबाला राजकारणात ओढण्याची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच मग तुमच्यासारखे चेले-चपाटे मागे कसे राहतील?” असा खोचक सवाल शालिनी ठाकरेंनी( Shalini Thackeray ) पत्रातून केला आहे.
अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही. #mns #rajsahebthackeray #sushmaandhare #djdolby#MaharashtraPolitics#maharashtranews@mnsadhikrut… pic.twitter.com/iNh1l4qoO9
— Shalini Thackeray (@ThakareShalini) October 6, 2023
“शिल्लक सेनाप्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून तुम्ही नैराश्यात आहात त्यामुळेच तुम्ही संबंध नसताना राज ठाकरेंच्या नातवाला राजकारणात ओढलं. हे निंदनीय व निषेधार्ह आहे. आपण याची जाहीर माफी मागितली पाहिजे. आपल्यालाही एक मुलगी आहे. स्वार्थी राजकारणापोटी तिच्याबाबत कुणी अशी विधानं केली तर ती तुमच्या मनाला रुचतील का?” असाही सवाल शालिनी ठाकरेंनी ( Shalini Thackeray )सुषमा अंधारेंना(Sushma Andhare) केला आहे.
गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजेच्या दणदणाटावर टीका करताना त्यावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर पोस्टही लिहिली होती. त्यावरून सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला होता. “एखाद्या बड्या नेत्याच्या नातवाला याचा त्रास होत असेल. मुंबईच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जात असेल तर हा मोठा नेता वक्तव्य करेल. फक्त दुपारी उठून कसं चालेल? यावर बोललं पाहिजे”, असा खोचक टोला सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांनी लगावला होता. त्यालाच आता शालिनी ठाकरे( Shalini Thackeray ) यांनी उत्तर दिले आहे.