“जयेशभाई जोरदार’मध्ये रणवीर सिंह बरोबर शालिनी पांडे

“अर्जुन रेड्डी’ या तेलगू सिनेमामधील शालिनी पांडे आता बॉलिवूडच्या पडद्यावर दिसणार आहे. तिच्या तेलगू सिनेमाला जेवढी प्रसिद्धी मिळाली होती, तेवढीच या पहिल्या हिंदी सिनेमातूनही मिळेल, अशी आशा तिच्या फॅन्सनी व्यक्‍त केली आहे. “अर्जुन रेड्डी’ला प्रसिद्धी खूप मिळाली, मात्र त्यावरून काही वादही निर्माण झाले होते. महिलांबद्दल खूप आकस असलेल्या व्यक्‍तीचे उदात्तीकरण त्यात केल्याची टीका झाली होती.

“अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक असलेल्या शाहिद कपूरच्या “कबीर सिंह’लाही खूप चांगले यश मिळाले होते. मात्र आता हा आरोप “जयेशभाई जोरदार’वर होणार नाही. आता शालिनी पांडे रणवीर सिंह बरोबरच्या “जयेशभाई जोरदार’मध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये रणवीर सिंह डोक्‍यावरून पदर घेतलेल्या काही महिलांच्या रक्षणार्थ उभा ठाकलेला दिसतो आहे. रणवीरने या सिनेमासाठी वजन घटवल्यासारखेही दिसते आहे. दिव्यांग ठक्कर हा नवोदित दिग्दर्शक या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. रणवीर सिंह सध्या कबीर खानच्या “83’च्या प्रमोशनच्या कामामध्ये व्यस्त आहे. तर शालिनी पांडेच्या रोलबाबत अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.