बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा मोस्ट अवेटिड “शकुंतला देवी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात विद्या बालन थोर गणितज्ज्ञ शकुंतला देवीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
जगभरात कर्तृत्व गाजवणा-या गणितज्ज्ञ शकुंतला देवीच्या या बायोपिकमध्ये विद्या बालन यापूर्वी कधीही न दाखविलेल्या प्रवासावर चित्रित करण्यात आला आहे. शकुंतला देवी या कॅल्क्युलेटरपेक्षा वेगवान आणि त्यांचा मेंदू संगणकाप्रमाणे चालत असल्याचे म्हटले जात.
विद्या बालनच्या चाहत्यांना “शकुंतला देवी’ चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये शकुंतला देवी आपल्या कौशल्य आणि गणिताने सर्वांन आश्चर्यचकित करत असल्याचे दिसून येते. शकुंतलाचे गणितांशी जितके जवळचे संबंध होते तितकेच कुटुंबाशी दुरचे संबंध होते. गिन्नीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणाऱ्या शकुंतला देवीच्या या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या सोशल मीडियासह यूट्यूबवर “शकुंतला देवी’ ट्रेंड होत आहे.
दरम्यान, अनू मेनन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जगातील 200 पेक्षा जास्त देशांमध्ये 31 जुलैपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.