शाकिब अल हसन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू

दुबई  – विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी आयसीसीने एकदिवसीय क्रिकेट मधील अष्टपैलू खेळाडूंची यादी जाहीर केली असुन बांगलादेशचा शाकिब अल हसनहा या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान असुन अफगाणिस्तानचा रशिद खान दुसऱ्या तर त्याचा संघ सहकारी मोहम्मद नबी तिसऱ्या स्थानी आहेत.

मात्र, या यादीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये एकही भारतीय खेळाडू सहभागी नसल्याने भारतीय संघासाठी हा मोठा धक्‍का आहे. यावेळी शाकिब अल हसनचे 359 गुण आहेत. तर, दुसऱ्या स्थानी असलेल्या रशिद खानचे 339 गुण असुन मोहम्मद नबीचे 319 गुण आहेत. यावेळी पाकिस्तानचा इमाद वसीमहा चौथ्या क्रमांकावर आहे तर मोहम्मद हाफिजहा सातव्या क्रमांकावर विराजमान आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.