मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या हटके स्टाइल आणि अभिनयाने त्याने अनेकांच्या मनात घर केले आहे. शाहरुखप्रमाणे त्याच्या मुलांची देखील कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा होत असते. नुकतेच आर्यन खानने त्याच्या कपड्यांचा एक लग्झरिअर ब्रॅंड सुरू केला आहे. मात्र हे कपडे प्रचंड महाग असल्याने नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एका नेटकऱ्याच्या प्रश्नावर मजेशीर उत्तर शाहरुखने दिले आहे.
काही दिवसांपूर्वी आर्यन खानने लग्झरिअर कपड्यांचा ‘D’YAVOL X’ हा ब्रँडची वेब साइट लॉन्च केली आहे. पण या कपड्यांची किंमत सर्वसामान्य माणसाला परवडणारी नाही. कारण कपड्यांच्या लाखोंच्या घरात आहेत. यावरून सोशल मीडियावर आर्यन खानवर टीका करण्यात आली आहे. एका नेटकऱ्याने ‘आर्यनच्या ब्रॅंडचे कपडे खूप महाग आहेत, आम्हाला परवडत नाहीत. कमी किंमतीचेही कपडे लॉंच करायला सांगा,’ असं म्हटलं होतं. तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘D’YAVOL X’ मध्ये जरा 1000 -2000 किंमतीचेही कपडे बनवा. जे आहेत ते खरेदी करण्यासाठी आम्हाला घर विकावं लागेल,’ असे म्हंटले होते.
Yeh D’Yavol X wale log mujhe bhi sasti nahi bech rahe….kuch karta hoon..!! #Jawan https://t.co/PLW9WUd6mg
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 6, 2023
युझरचा या मागणीवर शाहरुखने भन्नाट उत्तर दिले आहे. ‘‘D’YAVOL X’ चे लोक मलाही स्वस्तात काही देत नाही. काही तरी करतो मी…’ शाहरुखच्या या उत्तराने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, शाहरुखने आर्यन खानच्या कपड्यांच्या ब्रँडची जाहिरात शूट केली होती. बाप-लेकांना पहिल्यांदाच एकत्र पाहून चाहते देखील खुश झाले होते. विशेष म्हणजे या बॅंड्रची जाहिरातही त्याने स्वत: दिग्दर्शित केली आहे.