नवी दिल्ली – शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाला सोशल मीडियावर कितीही विरोध झाला असला तरी प्रेक्षकांनी मात्र प्रत्येक थिएटरमध्ये हाऊसफुलचा बोर्ड झळकावला. यामुळे चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. भारतासह विदेशात देखील पठाणची चांगलीच हवा पाहायला मिळते. राष्ट्रपती भवनच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये देखील पठाणचे स्पेशन स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते.
ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून पठाणच्या रिलीजची सर्वांनाच प्रतीक्षा होती. अखेर चित्रपट रिलीज झाला आणि सुपरहिट ठरत आहे. कमाईच्या बाबतीत तर चित्रपटाने बाहुबली आणि केजीएफ सारख्या चित्रपटांना देखील मागे टाकले आहे. दिवसेंदिवस पठाण कमाईचे नवीन रेकॉर्ड बनवत आहे. अशात राष्ट्रपती भवनच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये पठाणचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.
एस एम खान यांनीं ट्विट करत याबाबत माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”राष्ट्रपती भवनच्या सांस्कृतिक केंद्रामध्ये पठाणच्या स्पेशल शोच्या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले”. यावेळी त्यांनी शाहरुख खान आणि पूजा ददलानी यांना देखील टॅग केले आहे.
At special screening of #Pathan at Rashtrapati Bhavan cultural centre. @iamsrk @pooja_dadlani pic.twitter.com/976WYSDovw
— SM Khan (@SmkhanDg) January 28, 2023
छप्पर फाड कमाई सुरूच
बुधवारी म्हणजेच 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ऍडव्हान्स बुकिंगमध्ये हाऊसफुल झाल्याने चित्रपट मोठी करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पहिल्या दिवशी 57 कोटी दुसऱ्या दिवशी 70 कोटी अशी जबरदस्त ओपनिंग दिली. तिसऱ्या दिवशी कमाई जरा घसरली असली तरी शनिवारी 55 कोटी कमावल्याने कमाईचा आकडा पुन्हा वाढला आणि चित्रपट थेट दोनशे कोटी कमाईच्या घरात गेला. तर जगभरात या चित्रपटाने तब्बल तीनशे कोटींचा गल्ला पार केला आहे. रविवारी हा चित्रपट चारशे कोटींचा गल्ला पार करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.