मुंबई – अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एक चाहता रणबीरसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहे. रणबीर त्याच्याकडून फोन घेतो आणि बाजूला फेकून देतो. चाहत्यांना कधीही त्रास न देणाऱ्या रणबीरचे हे रूप पाहून सर्वांनासध्या च धक्का बसला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
या व्हिडिओमध्ये रणबीरसोबत एक मुलगा दिसत आहे. तो त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. वारंवार प्रयत्न करूनही जेव्हा तो फोटो क्लिक करू शकत नाही तेव्हा रणबीर त्याला सांगतो, दाखव… तो फोन त्यांच्या हातात देतो आणि रणबीर फोन मागे फेकतो. तो मुलगा बघतच राहतो.
दरम्यान, आता या व्हिडिओचे सत्य समोर आले आहे. आता या व्हिडीओचा पुढचा भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणबीर त्या चाहत्याचा जुना फोन फेकून त्याला नवीन फोन भेट म्हणून देतो. हा एक प्रमोशनल व्हिडीओ असल्याचे आता समोर आले आहे. रणबीरचा हा पब्लिसिटी स्टंट होता. एका मोबाईल ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी तो चाहत्यासोबत असं वागला होता. हे सत्य आता समोर आलं आहे.