मुंबई – बॉलीवूड किंग शाहरुख खान सध्या अॅक्शनने भरलेल्या ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज झाला, जो पाहिल्यानंतर चाहत्यांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाचा प्रिव्ह्यू 24 तासांत 100 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले.
शाहरुखने सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित प्रत्येक क्रू सदस्याचे आभार मानले. किंग खानच्या या प्रामाणिक वृत्तीवर चाहते फिदा झाले आहे किंग खानने ‘जवान’ दिग्दर्शक ऍटली कुमारसाठी ट्विट केले, ”सर!! मास!! सर्व गोष्टींसाठी धन्यवाद आणि AK मीर यांनी याची काळजी घेतल्याबद्दल आणि पायलसह त्यांचे इनपुट दिल्याबद्दल!! तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो.’
साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपतीही ‘जवान’चा एक भाग आहे. किंग खानसोबतचा हा त्याचा पहिला चित्रपट असेल. किंग खानने लिहिले, ‘सर तुमच्यासोबत काम करणे सन्मानाची गोष्ट आहे. मला तमिळ शिकवल्याबद्दल आणि मला स्वादिष्ट जेवण दिल्याबद्दल धन्यवाद.’ शाहरुख खानच्या या ट्विटचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. यावर विजय सेतुपतीने लिहिले, ‘हॅलो #जवान…’ हे ट्विट तमिळमध्ये करण्यात आले आहे. ‘जवान’च्या प्रिव्ह्यूला 112 मिलियन प्लस व्ह्यूज मिळाले आहे. किंग खानचा ‘जवान’ 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.