मुंबई- बॉलीवूडचे खान तसे काहीच वेळा एकत्र येतात. मात्र जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा इतिहास रचतात. करन- अर्जून पून्हा एकत्र कधी येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. मात्र आता अनेक चाहत्यांची ईच्छा पूर्ण होणार आहे.
शाहरूखने आपल्या ‘पठान’ सिनेमाची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र या सिनेमा जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच दीपिका पदुकोण देखील या सिनेमात दिसेल.
या चित्रपटात बिग स्टार सलमान खान दिसणार आहे. यामुळे ‘करण-अर्जुन’ लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील असं चाहत्यांच म्हणणं आहे. या वृत्ताने दोघांच्याही चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा शाहरुखने केलेली नाही. तरीही या दोघांनी एकत्र यावे, अशी मागणी आता त्यांचे चाहते करू लागले आहेत.