वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतील मतमोजणीदरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधींना उपस्थित राहू दिले जात नसल्याचा अध्यक्ष ट्रम्प यांनी केलेला दावा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाकारला आहे.
मतमोजणीदरम्यान नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे आणि मतमोजणीमध्ये पारदर्शकता राखली जाण्याला निवडणूक यंत्रणा कटिबद्ध आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
यंदाच्या अध्यक्ष्यांच्या निवडणूकीमध्ये मतपेट्यांची संख्या विक्रमी वाढली आहे. त्याबरोबर मतदान प्रक्रियेसाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थितीही योग्य प्रमाणात होती. काही ठिकाणी अतिउत्साही प्रतिनिधींना काळजीपूर्वक हाताळले जात आहे.
मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे.या यशिवाय मतमोजणीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू दिला गेलेला नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलेले आहे.