मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा अमेरिकेत अपघात झाला आहे. तो चित्रपटाच्या सेटवर एक सीन शूट करत होता, त्याच दरम्यान ही घटना घडली. या अपघातात शाहरुख खानच्या नाकाला दुखापत झाली. शाहरुखला यानंतर त्वरित जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे शाहरुखवर सर्जरी करण्यात आली. शाहरुखची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगण्यात येत असून तो मुंबईला परतला आहे.
शूटिंगदरम्यान शाहरुख खानच्या नाकाला दुखापत झाली, त्यामुळे रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. वृत्तानुसार, ही घटना घडली तेव्हा शाहरुख शूटिंगसाठी लॉस एंजेलिसमध्ये होता. त्याच्यवर शस्त्रक्रिया झाली आणि आता त्याच्या नाकावर पट्टी बांधली गेली आहे. डॉक्टरांनीही त्यांच्या टीमला सांगितले की काळजी करण्यासारखे काही नाही आणि ही किरकोळ दुखापत आहे. शाहरुख आता भारतात परतला आहे आणि मन्नतमध्ये तो आराम करत आहे. शाहरुख खान अनेक महिन्यांपासून चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर जात असतो.
वर्क फ्रंटवर, शाहरुख त्याचा पुढचा चित्रपट ‘जवान’च्या प्रदर्शनासाठी तयारी करत आहे. हा चित्रपट अॅटलीसोबतचा त्याचा पहिला चित्रपट आहे आणि त्यात दक्षिण चित्रपट उद्योगातील लेडी सुपरस्टार नयनतारा देखील आहे. ‘जवान’चा ट्रेलर टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग’शी जोडला जाणार आहे.