तेलुगु अभिनेता नानीने म्हटले आहे की “जर्सी’ हा चित्रपट शाहीद कपूरमुळे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यत पोहोचेल. 2019मध्ये प्रदर्शित झालेला “जर्सी’ हा सुपरहिट तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये शाहीद कपूर झळकणार आहे. यापूर्वी नानी याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
नानीने एका मुलाखतीत सांगितले की, हे सत्य आहे की, माझ्या चित्रपटाचा रिमेक साकारण्यात येत आहे. कारण या चित्रपटाला आजही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. त्यांना माझे काम आवडले आहे. तसेच “जर्सी’सारख्या चांगल्या चित्रपट मोठ्या पडद्यावर साकारण्यात येत असल्याने मला विशेष आनंद होत आहे.
तसेच या रिमेकमध्ये बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता शाहीद कपूर काम करत असल्याने या चित्रपटाला मोठा “रिच’ मिळेल, असेही त्याने सांगितले. नानी म्हणाला, “जर्सी’ हा त्याच्या चित्रपटाचा रिमेक आहे. हे अनेकांना ठाऊकही नसेल आणि असेही होऊ शकते की मला अनेक प्रेक्षक ओळखत नाहीत; परंतु या रिमेकमधून त्याला आणखीन प्रेक्षकांची पसंती मिळेल, ज्याला गौतम यांनी खूप सुंदरतेने मांडले आहे.