पठाण चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ तीन दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले आहेत. हा सर्व चाहत्यांच्या प्रार्थनांचा परिणाम आहे. याबद्दल आभार मानण्यासाठी बॉलिवूडच्या ‘बादशाह’ने ट्विट केले आहे. शाहरुखने दरवेळेप्रमाणेच त्याच्या खोडकर चाहत्यांच्या प्रश्नांना अचूक उत्तरे देऊन त्यांची मने जिंकली आहेत.
Ha ha lagta hai ab gaon waapis chala jaaoon!! https://t.co/3fHlaylCZR
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 28, 2023
‘पठाण’च्या रेकॉर्डवर शाहरूख खान खूश –
‘पठाण’चा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड पाहून शाहरूखच्या आनंदाला पारावार उरला नाही. एका चाहत्याने विचारले, ‘हे रेकॉर्ड पाहिल्यानंतर तुम्हाला कसे वाटते?’ शाहरुख म्हणाला, ‘हा हा मला आता गावी परत जावंसं वाटतंय’. कलेक्शन नंबर इतके छान आहेत की विचारूच नका. दुसऱ्या चाहत्याने विचारले की, ‘पठाण’ चित्रपटाचे कलेक्शन पाहून कसे वाटते? शाहरुखने सडेतोड उत्तर देताना ‘भाई नंबर फोन के होते हैं, हम तो खुशी गिनते हैं’ असे सांगितले.
As happy as a father is when he sees his child being appreciated. #Pathaan https://t.co/ubsGhwCEJ5
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 28, 2023
शेवटचे तीन दिवस शाहरुखच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस –
गेले तीन दिवस कदाचित शाहरुख खानच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस ठरले आहेत. यावर उत्तर देताना किंग खानने लिहिले की, ‘मुलाचे कौतुक होत असताना बाप जितका आनंदी होतो, तेवढीच खुशी मला होत आहे.’ या चित्रपटातील सलमान खान आणि शाहरुख खानची जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे. दोघांनी ‘करण अर्जुन’ची आठवण करून दिली आहे.
लोकांचा प्रतिसाद पाहून शाहरुख खूश-
‘पठाण’ला मिळालेला लोकांचा प्रतिसाद इतका जबरदस्त आहे की किंग खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा ‘किंग’ बनला आहे. हा प्रतिसाद पाहून शाहरुख खूश झाला आहे. तो म्हणाला, ” नाचो- गाओ, हंसो, क्या पता कल हो न हो. लेकिन सब करो थोड़ा प्यार से. एक-दूसरे की देखभाल करो, वह भी तब जब आप पठान को सेलिब्रेट कर रहे हों. ध्यान रहे, किसी को चोट न लगे.”