मंगळ ग्रहावर अनेक वेळा विचित्र आकार दिसतात. आता त्याच्या पृष्ठभागावर अस्वलाच्या चेहऱ्याचा आकार दिसला आहे. अस्वलाच्या चेहऱ्याप्रमाणे चहुबाजूंनी गोलाकार वर्तुळ आहे. डोळ्यांच्या जागी दोन विवर दिसतात. नाक आणि तोंडाऐवजी, एक उंच जागा आहे, म्हणजे डोंगराळ भाग. त्यातून अस्वलाचे तोंड व नाकाचा भाग दिसत आहे.
हा फोटो अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या मार्स रिकाॅन्सेंस ऑर्बिटरने घेतला आहे. हा उपग्रह मंगळाभोवती फिरत आहे. परिभ्रमण करताना ते मंगळाच्या पृष्ठभागाचा आणि हवामानाचा अभ्यास करते. नासाच्या या ऑर्बिटरने 12 डिसेंबर 2022 रोजी अस्वलाचा चेहरा टिपला. वास्तविक हे टेकडीसारख्या उंच जागेचे चित्र आहे, जे अस्वलाचे नाक आणि तोंड बनवते. त्याच्या वर डोळ्यांच्या जागी दोन विवर आहेत. हे खड्डे उल्कापिंडाच्या आघाताने तयार झालेले दिसतात.
हे छायाचित्र घेतल्यानंतर अॅरिझोना विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना जेव्हा डेटा मिळाला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्यांच्या मते नाकाच्या जागी व्ही आकाराची टेकडी आहे, जी पडली आहे. त्यामुळे नाक आणि तोंडाची रचना दिसते. त्याभोवती बनवलेला गोलाकार खड्डा अस्वलाचे डोके बनवतो.
नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, मानवी स्वभाव आहे की, तो प्रत्येक आकार त्याला माहित असलेल्या आकारात मिसळून पाहतो. 2019 प्रमाणे या उपग्रहाने मंगळावर स्टार ट्रेक चित्रपटातील लोकांना पाहिले होते. 2011 मध्ये काही लोकांनी दावा केला होता की, नासाने बनवलेल्या मंगळाच्या नकाशात त्यांनी महात्मा गांधींचा चेहरा पाहिला आहे. 2005मध्ये नासाने मंगळाच्या कक्षेत मार्स रिकोनिसन्स ऑर्बिटर उपग्रह पाठवला होता.