छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यात सध्या कमालीची पाणी टंचाई (Marathwad water issue) निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर अप्पर गोदावरी खोऱ्यातून जायकवाडी धरणात त्वरीत पाणी सोडण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या (Ncp) शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संबंधात मराठवाडा पाणी परिषदेकडून आंदोलन सुरू होण्याची शक्यता आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर वृत्तसंस्थेशी बोलताना टोपे म्हणाले, “मराठवाड्यात पाणी सोडण्याची मागणी करण्याचे अधिकार आम्हाला आहेत. ते पाणी तेथील जनतेसाठी सोडणे हा आमचा हक्क आहे. पाणी सोडण्याचे आदेश 30 ऑक्टोबर रोजी देण्यात आले होते, परंतु ते अद्याप सोडण्यात आलेले नाही. (jayakwadi dharan)
“महापालिकेतील काही उच्चपदस्थ अधिकारी या मुद्द्यावर दबाव आणत असल्याने पाणी सोडले जात नाही. दिलेल्या आदेशांचे पालन होत नाही, याकडे सरकार लक्ष ठेवून आहे, पण तरीही कोणतीही कारवाई होत नाही,असे टोपे यांनी नमूद केले.
आज छत्रपती संभाजीनगर येथे उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समुहातील जलाशयामधील पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडणे बाबत राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन दिले. pic.twitter.com/7KthThiM25
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 19, 2023
मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबतचे निवेदन त्यांना टोपे यांनी दिले, त्यांनी या प्रकरणी लक्ष घालू आणि परिस्थितीवर लवकरच निर्णय घेऊ,” असे आश्वासन दिल्याचे देखील टोपे यांनी सांगितले. जायकवाडी धरणासाठी 30 ऑक्टोबर रोजी जीएमआयडीसीने 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते, परंतु राजकीय दबावामुळे अद्याप विसर्ग झाला नाही.