Indian Team In ICC Tournaments : भारतीय संघाने पुन्हा एकदा आयसीसीचे जेतेपद गमावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने आयसीसी टूर्नामेंट गमावण्याची गेल्या 9 वर्षांतील ही पहिलीच वेळ नाही. गेल्या 9 वर्षांत म्हणजे 2014 ते 2023 पर्यंत टीम इंडियाने एकूण 10 ICC विजेतेपदे गमावली आहेत. संघ जवळजवळ अनेक वेळा हरला.
गेल्या 10 आयसीसी (ICC) विजेतेपदांमध्ये भारतीय संघ 4 वेळा उपांत्य फेरीत आणि 5 वेळा अंतिम फेरीत पराभूत झाला आहे. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये (चॅम्पियन्स ट्रॉफी 2013) महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाला आयसीसीचे कोणतेही विजेतेपद मिळालेले नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये जिंकला होता.
2013 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर पुढच्याच वर्षी 2014 मध्ये भारत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हरला होता. त्यानंतर 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. अशाप्रकारे संघाने 10 आयसीसी विजेतेपदे गमावली. या दहा स्पर्धेमध्ये टीम इंडिया फक्त एकदाच 2021 सालच्या टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडली होती.
याशिवाय एकदा बाद फेरीत संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
भारताने 2014 ते 2023 पर्यंत गमावलेली 10 ICC विजेतेपदे…
T20 (विश्वचषक 2014) – अंतिम फेरीत पराभव
ODI (विश्वचषक 2015) – उपांत्य फेरीत पराभव
T20 (विश्वचषक 2016) -उपांत्य फेरीत पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 – अंतिम फेरीत पराभव
ODI (विश्वचषक 2019) – उपांत्य फेरीत पराभव
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप(2019-21) – फायनलमध्ये पराभूत.
T20 (विश्वचषक 2021) – ग्रुप स्टेजमधूनच बाहेर
T20 (विश्वचषक 2022) – उपांत्य फेरीत पराभव
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (2021-23) – फायनलमध्ये पराभूत.
ODI (विश्वचषक 2023) – अंतिम फेरीत पराभूत.