सातारा – सातारा जिल्हा रुग्णालयातील मरकज काळात दिल्ली येथे भेट दिलेला एक ३७ वर्षीय पुरुष व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्या ७ संशयित रुग्णांचे असे एकूण ८ जणांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
या आठ जणांच्या घशातील स्त्रावाचा नमुना पुण्यातील एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. तसेच कोविड-19 बाधित रुग्णाच्या सहवासात असणाऱ्या १७ ते ५४ वर्ष वयोगटातील ९ नागरिकांना (पुरुष-४ व महिला ५) संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांच्या घशातील स्त्रावाचा नमुना आज (दि. ६) पुण्यातील एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.