सातारा – क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या २, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील २, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील २ व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील १ अशा एकूण ७ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
काल दि. 15 एप्रिल रोजी रात्री उशीरा मुंबई व इतर ठिकाणाहून प्रवास करुन आलेल्या 5 नागरिकांना क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात तर कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात ६ नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे असे एकूण ११ संशयितांचे घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी कोरेगांव येथील 2 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. उर्वरित 9 या जणांचा अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
तसेच कृष्णा हॉस्पिटलमधील विलगिकरण कक्षात दाखल असणाऱ्या एका बाधित रुग्णाच्या घशातील स्त्रावांचा नमुना १४ दिवस पूर्ण झाल्याने तपासणी करीता बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.