हडपसर – भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व लोकनेते मा. ग्रामविकासमंत्री गोपीनाथजी मुंडे यांची जंयती व माजी नगरसेवक मारूतीआबा तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसरमध्ये सेवा पंधरवडा आयोजीत करण्यात आला होता. अनाथ आश्नम, मतिमंद शाळा, वृद्धाश्नम, गो-शाळा, सेवाभावी सस्था, मनपा शाळामध्ये जीवनावश्यक, शालेय वस्तु, ब्लकेट, किराणा साहित्य व चारा वाटप करण्यात आले.
याशिवाय रक्तदान, आरोग्य व नेत्रचिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 165 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच 1500 जणांनी आरोग्य तपासणी व नेत्रचिकित्सेचा लाभ घेतला. दरम्यान, मारूती आबा तुपे यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनिल कांबळे, जिवन जाधव, भुषण तुपे, रवि तुपे, विजय मोरे, निलेश मगर, नाना भानगिरे, डॉ. शंतनु जगदाळे, ईशान तुपे, नितीन आरू, महेश पुंडे, प्रशांत सुरसे, सुनिल बनकर, कुमार तुपे, मंगेश केंद्रे, शिवा शेवाळे, योगेश सुर्यवंशी, स्वाती कुरणे, नलिनी मोरे, अमित गायकवाड, माऊली कुडले, बच्चुसिंग टाक, संजय कांबळे, जितु भंडारी अशोकनाना तुपे, गोरख तुपे, संजय पारीख, विकास गदादे, संकेत झेंडे, ओकार तुपे, कुणाल चौरे, दादा मेमाणे, दिलीप तुपे, भाऊ जगताप, सतिष भिसे व धर्मवीर योगा ग्रुपचे सर्व् सदस्य उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने स्नेहमेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्याला माजी आमदार महादेव बाबर, साईनाथ बाबर, विजय देशमुख, योगेश ससाणे, महेश ससाणे, रोहिदास लगड आदिंसह प्रभागातील सोसायटीचे चेअरमन व पदाधिकारी मोठया सख्यने उपस्थित होते.
आबा तुपे यांचे काम आदर्शवत –
समाजसेवेचा वसा घेत असताना समाजाच्या उपयोगी पडावे व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या एकाच भावनेतून समाजातील गरजू घटकांना या सेवेचा लाभ घेता यावा. ही उदात्त भावना उराशी बाळगून माजी नगरसेवक मारुती आबा तुपे यांचे काम आदर्शवत आहे.
– दिलीप कांबळे, माजी राज्यमंत्री