हडपसर : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सकल मराठा समाजाची बैठक नुकतीच झाली. सरकारने फसवणूक केल्याच्या निषेधार्थ शिरूर लोकसभा मतदार संघ निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदार संघातून शंभरहून अधिक उमेदवारी अर्ज भरण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.
मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने या बैठकीत सहभागी झाले होते. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून ज्या मागण्या आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी केल्या त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून जे मागितले नाही ते दहा टक्के आरक्षण देऊन समाजाची बोळवण केली,
तसेच आंतरवाली सराटी येथे 24 मार्च रोजी जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण राज्याची तसेच देशातील 14 राज्यातील मराठा बांधवांची बैठक होत असून या बैठकीत हडपसर आणि परिसरातून जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी जाण्याचे आवाहन समाजाला करण्यात आले.
या बैठकीप्रसंगी काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघातून शंभरहून अधिक मराठा समाजाच्या बांधवानी उमेदवारी अर्ज भरणे, समाजातील बांधवांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने मागे घ्यावेत,
तसेच 24 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणाऱ्या निर्णयानुसार पुढील दिशा ठरविली जाईल तसेच हडपसर आणि परिसरातील संपुर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पने उभा आहे.
मराठा समाज बांधवांची आज हडपसर मध्ये बैठक झाली या बैठकीत लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आणि 24 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे पुढील दिशा ठरविण्याचे ठराव संमत करण्यात आले आहेत.
कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार न करता जो समाजासाठी उभा राहील तो आमचा उमेदवार राहील. असे मत मराठा आरक्षण समन्वयक समिती हडपसर यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.