राजुरी – बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध असणारा भाग म्हणून राजुरी गावची ओळख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. खासदार असताना किंवा नसताना विकासकाम करत राहिल. जनतेची सेवा करणे हा ध्यास मनाशी बाळगून विकासकाम करीत आहे. गावातील विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांणी या ठिकाणी दिली.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून राजुरी (ता.जुन्नर) येथील स्मशान भूमीमधील कामांसाठी 40 लाख रुपयांचा निधी दिला असून या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी सभापती दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, वल्लभ शेळके, बाळासाहेब औटी, प्राचार्य जी. के. औटी, कुंडलिक हाडवळे, लक्ष्मण घंगाळे, एम. डी. घंगाळे, एकनाथ शिंदे, शाकीर चौगुले, रंगनाथ औटी, सखाराम गाडेकर, गौरव घंगाळे, बाळासाहेब हाडवळे, गोविंद औटी, मुरलीधर औटी, गोरक्ष हाडवळे, संजय औटी, कारभारी औटी, अनिल रायकर, सुदाम औटी आदी मान्यवरांसह गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.