बेलग्रेड, (सर्बिया) – सर्बयीामध्ये गेल्या चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनामुळे तेथील अध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अध्य7ांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील हे आंदोलन सुरू आहे. बेलग्रेड शहरामध्ये दोनवेळा सामुहिक गोळीबारामध्ये 18 जण ठार झाले होते. त्यानंतर हे आंदोलन पेटले होते.
दिनांक 3 मे रोजी एका किशोरवयीन मुलाने बेलग्राडमध्ये 9 विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकाला गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 21 वर्षीय व्यक्तीने 8 लोकांची हत्या केली होती. हा हिंसाचार रोखण्यात सरकारला अपयश आल्याच्या आरोपातून लोकांनी अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू केले होते. सत्तारुढ सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या सरकारमुळे देशात हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा आंदोलकांच्यावतीने करण्यात येऊ लागला होता.
देशात हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांचे प्रसारण करणाऱ्या टिव्ही वाहिन्यांचे परवाने रद्द करण्यात यावे. तसेच राजकीय विरोधकांवर हल्ल्यांना चिथावणी देणाऱ्या सरकारधार्जिण्या वर्तमानपत्रांवरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही आंदोलकांच्यावतीने करण्यात येत होती.
वुसिकयांची वादग्रस्त कारकिर्द
सर्बियाचे अध्यक्ष अलेक्जांडर वुसिक हे वयाच्या 53 व्या वर्षी 2012 साली देशाचे अध्यक्ष झाले होते. त्यांच्या आगोदर अध्यक्ष राहिलेल्या तोमिस्लाव निकोलिक यांनी 2008 साली कट्टरवादी सर्बियन रॅडिकल पार्टीची वाढ झाल्यावर त्या पक्षाच्या स्थापनेपासून देशाचे अध्यक्षपद ताब्यात ठेवले होते. 2017 साली देशाचे अध्यक्ष होण्यापूर्वी अलेक्जांडर वुसिक हे देशाचे उपपंतप्रधान आणि नंतर पंतप्रधान म्हणूनही निवडले गेले होते. 2022 ते दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले होते. त्यांचा कालावधी 2027 मध्ये संपणार होता.