मुंबई – अभिनेता संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांचा 1993 मध्ये रिलीज झालेला ‘खलनायक’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. 30 वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे निर्माते सुभाष घई यांनी याबाबत माहिती दिली असून यासोबतच त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम सुरू करणार असल्याचं सुभाष घई यांनी म्हटलं आहे.
खलनायक या चित्रपटाला ६ ऑगस्ट रोजी ३० वर्षे पूर्ण झाली. सनी देओलच्या गदर 2 चे बॉक्स ऑफिसवरील यश पाहून सुभाष घई यांनी त्यांच्या चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘खलनायक’च्या दुसऱ्या भागावर काम करत असल्याचे सुभाष घई यांनी सांगितले.
एका मुलाखतीत सुभाष घई यांनी सांगितले, हा चित्रपट 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे, मुक्ता आर्ट सिनेमाच्या माध्यमातून तो चित्रपट 100 हून अधिक स्क्रीनवर पुन्हा प्रदर्शित करणार आहे. ‘कर्मा’, ‘सौदागर’ आणि ‘खलनायक’ या त्यांच्या एका मोठ्या चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार असल्याचे सुभाषने सांगितले. ते म्हणाले, आमच्याकडे स्क्रिप्ट आहे आणि आम्ही त्यावर काम करतोय. लोकांना नॉस्टॅल्जिया आवडते आणि खलनायकचा बल्लू बलराम पडद्यावर मोठ्या प्रमाणात दिसू शकतो.
सुभाष घई पुढे म्हणाले, गदर 2 च्या यशानंतर मला अनेक संदेश येत आहे, तुम्ही खलनायक 2 का बनवत नाही?’ आम्ही त्यावर विचार करत आहोत आणि लवकरच तुम्हाला ही बातमी कळेल. यात संजय आणि एक नवीन स्टार असेल, दोघेही एकत्र असतील.” यावरून लवकरच या चित्रपटाच्या सीक्वलची लवकरच घोषणा होणार असल्याची चर्चा सुरु आहे.