नवी दिल्ली : झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. २२ ऑगस्ट रोजी वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासून हीथ स्ट्रीक कर्करोगाने ग्रस्त होते. मात्र त्यांची कर्करोगाशी झुंज स्ट्रीकने अखेर जगाचा निरोप घेतला. स्ट्रीक कोलन आणि लिव्हर कॅन्सरशी गेल्या बऱ्याच दिवसांपासून झुंज देत होता. त्याच्यावर दक्षिण आफ्रिकेत उपचार सुरू होते. अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली आणि त्याने जगाचा निरोप घेतला.
झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या स्ट्रीकने २००० ते २००४ दरम्यान आपल्या देशाचे नेतृत्व केले. त्याच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ६५ कसोटी सामने आणि १८९ एकदिवसीय सामने खेळलेत. झिम्बाब्वेच्या क्रिकेटची प्रतिष्ठा देखील काही वेळा त्याने एकट्यानेच राखली.
Sad news coming through that Heath Streak has crossed to the other side. RIP @ZimCricketv legend. The greatest all rounder we produced. It was a pleasure playing with you. See you on the other side when my bowling spell comes to an end…😔
— Henry Olonga (@henryolonga) August 22, 2023
झिम्बाब्वेकडून कसोटी सामन्यांत १०० विकेट घेणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. स्ट्रीकची गोलंदाजी कौशल्ये ही त्याची संपत्ती होती, पण तो बॅटींगमध्येही कमी नव्हता. हरारे येथे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने नाबाद १२७ धावा केल्या, हे त्याचे एकमेव कसोटी शतक आहे.
स्ट्रीकच्या कारकिर्दीची सुरुवात १९९३ मध्ये त्याच्या पाकिस्तानविरुद्धच्या पदार्पणाने झाली. २००५ मध्ये त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर, स्ट्रीक झिम्बाब्वे, स्कॉटलंड, बांग्लादेश, गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना प्रशिक्षण देत होते. भ्रष्टाचारविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर आयसीसीने आठ वर्षांची बंदी घातली होती. तेव्हा त्याची कारकीर्द धुळीला मिळाली. हा धक्का असूनही, क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून स्ट्रीकचा वारसा उच्च आहे आणि त्याचे नुकसान संपूर्ण क्रिकेट जगताला जाणवले.