कचरा उचलण्यासाठी वेगळे वेळापत्रक

त्यानुसार लॉकडाऊन कालावधीमध्ये कचरा संकलन होणार

पुणे – महापालिकेकडून शहरातील कचरा संकलनासाठी वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार, लॉकडाऊनच्या कालावधीत कचरा संकलन केले जाणार आहे. त्यानुसार, प्रशासन ओला कचरा दररोज संकलित करणार असून इतर कचऱ्यासाठी दिवस निश्‍चित करून दिले आहेत. त्यानुसार, नागरिकांनी आपल्या कचऱ्याचे नियोजन करावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी केले आहे.

शहरात करोनाच्या संक्रमणामुळे महामारी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. सध्या शहरामध्ये 2100 टन इतका कचरा निर्माण होत असून त्यापैकी सुमारे 250 टन इतका कचरा रिसायकलिंगसाठी जातो. उर्वरित सर्व प्रक्रिया करण्यात येते.

ज्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते त्या प्रकल्पांमधील काम करणारे मजूर हे बहुतांशी बाहेर गावाकडचे आहेत. करोना विषाणूच्या भीतीमुळे बऱ्याच प्रकल्पावरील कर्मचारी हे काम सोडून त्यांच्या गावाला गेले आहेत.

यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण करणे अत्यंत अडचणीचे होत आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीसुद्धा बंधने आली आहेत. कचऱ्याचे वर्गीकरण करून देण्याकरिता वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यास अनुसरून सर्व नागरिकांनी यापुढील काळामध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करून संबंधित कर्मचाऱ्यांकडे हस्तांतरित करावयाचा आहे.

…असे आहे वेळापत्रक
सोमवार : प्लॅस्टिक/सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स आणि ओला कचरा
मंगळवार : ई-वेस्ट कचरा/सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स आणि ओला कचरा
बुधवार : मेडिकल वेस्ट कचरा/सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स आणि ओला कचरा
गुरुवार : काच, पत्रा व इतर/सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, ओला कचरा
शुक्रवार : घरातील टाकाऊ वस्तू व कपडे/सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स आणि ओला कचरा
शनिवार : कपडे, चिंध्या, गाद्या/सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांचे डायपर्स/अडल्ट डायपर्स आणि ओला कचरा

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.