बॉलीवूडची नायिका आदिती राव हैदरी ही सध्या “द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटाबाबत चांगलीच उत्सुक आहे. अर्थात त्याचं कारणही तसं आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तिचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. “दास देव’ हा मागील काळात आलेला चित्रपट ही तिच्या आयुष्यातील एक चूकच म्हणावी लागेल. पण आता तिला आपल्या आगामी चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
आदिती म्हणते, या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या रिब्बू दासगुप्ता यांनी चित्रपटासाठी फार काम केलेले नाही; पण ते अतिशय गुंतागुंतीचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट रहस्य आणि रोमांच अशा दोहोंनी भरलेला आहे. मी, परिणीती आणि किर्ती कुल्हारी अशा तिघी जणी या चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारत आहोत. चित्रपटाच्या थ्रीलरचा विषय मी सांगू शकत नाही; पण चित्रपटाचे शीर्षक बरेच काही सांगून जाणारे आहे, असे आदिती म्हणते.
आदितीची ही “ट्रेन सफर’ कशी ठरतेय ते येणाऱ्या काळात पहावं लागेल! गेल्या 14 वर्षांच्या करिअरमध्ये आदिती “दिल्ली 7,’ “ये साली जिंदगी’, “रॉकस्टार’, “मर्डर 3′, “वजीर’, “फितूर’, “पद्मावत’, “भूमी’ यांसारख्या एक डझनाहून अधिक चित्रपटातून झळकली आहे. पण मध्यंतरी तिच्या करिअरमध्ये एक स्पीड ब्रेकर आला होता. पाहूया तो आता ती पार करतेय का ते !